भरधाव कारची वृध्दाला धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळील पुलावरून पायी जात असलेल्या वृध्दाला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, याकुब शेख चॉद खाटीक (वय-६०) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास याकुब खाटीक हे शिरसोली गावातील पुलावरून पायी जात असतांना मागुन भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १४ ३६७०) ने जोरदार धडक दिली. या अपघातात याकुब हे जखमी झाले. तर कार चालक हा कार घेवून पसार झाला. जखमी झालेल्या वृध्दाला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवारी १७ सप्टेंबर रोजी  दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात  अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

 

Protected Content