आमच्या जीवाला धोका ; दोन मंत्र्यांची सुरक्षा वाढविण्याची मागणी

 

jitendra avhad

मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत आपली सुरक्षा वाढविण्याची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे म्हटले.

 

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत-पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर ठाणे पोलीस दलाकडून जितेंद्र आव्हाडांना सुरक्षा दिली जात होती. त्याआधी 2018 मध्येही आव्हाडांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र आव्हाड हे सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर असल्याचे गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केले होते. तरीही गेल्या वर्षी जानेवारी 2019 मध्ये फडणवीस सरकारने जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाव्यवस्था काढली होती.

Protected Content