ओबीसींच्या आरक्षण संरक्षणाचा एकमुखी निर्धार

अहमदनगर: वृत्तसंस्था । मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्याची मागणी होत आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सर्व संघटनांनी संघटीतपणे एकमुखी लढा उभारण्याची निर्धार केला आहे त्यासाठी नगरमध्ये २३ नोव्हेंबरला ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यातच मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची ही मागणी अनेकदा पुढे येत असते. मात्र त्याला ओबीसी समाजातील अनेक संघटनांचा विरोध आहे. त्यासाठी लढा उभारण्याची तयारीही या संघटनांनी सुरू केली असून त्याच अनुषंगाने नगरमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांची बैठक नगरमध्ये झाली. या बैठकीला समता परिषद, जय भगवान महासंघ, नाभिक महामंडळ, तेली समाज संघटना, धनगर महासंघ, मल्हार सेना, ओबीसी परिषद, सावता परिषद, कुंभार समाज, सोनार समाज, गुरव समाज, चांभार समाज, फुले ब्रिगेड, सावता युवक आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याकडे ओबीसी समाजासह इतर समाजाचेही लक्ष लागले आहे.

Protected Content