सलग वीस महिने अश्लिल मॅसेजेस; तरूणीची पोलीसांकडे धाव

जळगाव प्रतिनिधी । गुजराल पेट्रोल पंप परिसरात उच्च शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरूणीच्या मोबाईलवर वेगवेगळ्या नंबरवरून अश्लिल मॅसेज पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरात आई व भावासोबत राहते. उच्चशिक्षण घेत असून सध्या लॉकडाऊनमुळे घरीच अभ्यास सुरू आहे. तिच्याकडे तिच्या आईच्या नावे असलेला मोबाईल क्रमांक आहे. शिक्षण घेत असतांना कॉलेजच्या होस्टेलमध्ये २४ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री १० वाजता अज्ञात व्यक्तीच्या नंबरवरून “आय लव यू गुड नाईट’ असा मॅसेज टाकला. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२०, २७ फेब्रुवारी रोजी देखील असेच मॅसेज पुन्हा पाठविले. याकडे तरूणीने दुर्लक्ष केले. लॉकडाऊनच्या काळात ती घरी असतांना ३१ जुलै २०२० रोजी पुन्हा अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. अनोळखी नंबर असल्यामुळे तरूणीने फोन उचलले नाही. ऑगस्ट महिन्यात चार ते पाच वेळा फोन आले, पण तरूणीने उचलला नाही. दरम्यान, तरूणीने नंबर कोणाचा आहे याची विचारणा करण्यासाठी आलेल्या नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्ती उचलतो मात्र बोलत नाही. किंवा फोन उचलत नाही. काल १९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता व्हॉटसॲपवर पुन्हा अश्लिल मॅसेज पाठविले. आतापर्यंत गेल्या २० महिन्यात ४३ मॅसेज अज्ञात व्यक्तीने पाठविले आहे. तरूणीने कंटाळून तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content