पोलन पेठेतील स्वीटमार्टचे दुकान फोडले; शहर पोलीसात चोरट्यांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोलन पेठ मधील स्वीटमार्टसह व्यास लॉटरीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला लंपास केल्याचा प्रकार आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, सतिश मुरारीलाल अग्रवाल रा. नागेश्वर कॉलनी यांचे पोलन पेठेत ब्रिजविलास स्वीटमार्ट नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारीच रितेश व्यास (रा. पोलनपेठ) यांचे लॉटरीचे दुकान आहे. ते दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहतात. रात्री साडे ९ वाजेच्या सुमारास दोन्ही दुकाने बंद होतात. सोमवारी देखील नेहमीप्रमाणे दुकानांना कुलूप लावून अग्रवाल व व्यास हे घरी निघून गेले. मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून स्वीटमार्टमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्क्रु ड्रायव्हरच्या मदतीने ड्रॉव्हर तोडून त्यातील ८ हजार ५०० रूपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर व्यास यांचे दुकान फोडून ७ हजार रूपयांची रोकड घेवून पोबारा केला. आम्ही ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’च्या बातम्या चोरतो.

सतिश अग्रवाल हे नेहमीप्रमाणे सात ते साडे सात वाजेच्या सुमारास कारागिरांसह स्वीटमार्ट दुकानावर आले़ त्यावेळी त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेले दिसून आले़ आत प्रवेश केल्यानंतर ड्राव्हरमधील रक्कम आणि चेक तसेच इतर काही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचे दिसून आले़ काही वेळानंतर रितेश व्यास यांच्या वडीलांनाही मुलाचे दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले़ त्यांनी लागलीच हा प्रकार मुलगा रितेश याला सांगितला़ नंतर रितेश याने दुकानात जावून पाहीले असता, सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता़ तर सात हजाराची रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले़

ब्रिजविलास स्वीटमार्टमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्यामुळे चोरीचा संपूर्ण प्रकार त्यात कैद झाला आहे. चोरी केल्यानंतर दुकानात सीसीटीव्ही सुरू असल्याचे लक्षात येताच चोरट्याने ते देखील बंद केल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. दुपारी सतिश अग्रवाल व रितेश व्यास यांनी शहर पोलीस ठाणे गाठून सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content