स्वातंत्र्यदिनी आजी-माजी सैनिकांसह कुटुंबीयांचा सन्मान

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील भारतीय सैन्य व पोलीस प्रशासनातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवाराच्या घरी जाऊन तालुका युवा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यंदाचा भारतीय स्वातंत्र्य दिन अविस्मरणीय करण्याच्या उद्देशाने, जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने ‘एक दिवस सैनिक भावासाठी व त्यांच्या परीवारासाठी…!’ हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत यावल तालूका युवा परिषदेच्यावतीने तालूक्यातील फैजपूर शहरातील भारतीय सैन्य व पोलीस प्रशासनातील आजी – माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचा घरी जाऊन देशप्रेमाच्या भावनेतून कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.

Protected Content