अवधूत मठीत सहा हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा

 

भडगाव, प्रतिनिधी । येथील श्री दत्त संस्थान उर्फ अवधूत मठी येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु भक्त नारायण परदेशी यांच्या हस्ते दीपोत्सवाचे दीप प्रज्वलन करण्यात आले.

गेल्या बारा वर्षापासून दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवासाठी जळगाव सह इतर जिल्ह्यातूनही भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दीपोत्सव साजरा करतांना अध्यक्ष मिलिंद महाराज दातार, भडगावचे माजी नगरसेवक विजयकुमार देशमुख , विजय देशपांडे, डॉ. दुर्गेश रुले, आदी सह भक्तमंडळी उपस्थित होते.

यावर्षी देखील दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे भक्तांची संख्या कमी होती. भक्तांनी सुरक्षित अंतर ठेवून व मास्क लावून दीपोत्सवात सहभागी झाले होते. दर वर्षी दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येते. परंतु यंदा पासून हा मान गुरु भक्त नारायण परदेशी यांनी दीपोत्सवाचे दीपप्रज्वलन केले. दरवर्षी भक्तांना मधून एकाची निवड करून त्यांच्या हस्ते दीप उत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल असे संस्थानचे अध्यक्ष मिलिंद महाराज यांनी सांगितले. तसेच भक्त मंडळींनी मंदिराच्या गभाऱ्यासह सभामंडप, मंदिराच्या आवारात ६ हजार दिवे लावण्यात आले. त्यामुळे दिव्यांचा झगमगाट दिसणारे नयनरम्य दृष्य अनेकांना मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही.

Protected Content