काश्मिरातील विरोधी आघाडीला अमित शाह यांचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुपकार ठरावावरून याच्याशी निगडीत पक्षांसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गुपकार गँग ग्लोबल होत आहे, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी, गुपकार गँगने देशाचा मूड सांभाळला नाही तर लोक त्यांना बुडवतील, असा इशाराही शाह यांनी दिला आहे.

”गुपकार गँग ग्लोबल होत आहे! त्यांची इच्छा आहे की परदेशी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करावा. गुपकार गँग भारताच्या तिरंगा ध्वजाचाही अपमान करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा गुपकार गँगच्या अशा कृत्यांना पाठिंबा आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. भारतीय लोकं आता यापुढे आपल्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात कोणतेही अपवित्र ग्लोबल आघाडी सहन करणार नाहीत.” असं अमित शाह यांनी ट्विट केलं आहे.

शाह यांनी आरोप केला आहे की, ”काँग्रेस व गुपकार गँग जम्मू-काश्मीरला दहशत व अशांततेच्या युगात घेऊन जाऊ इच्छित आहे. ते कलम ३७० ला हटवून दलित, महिला आणि आदिवासींचा अधिकार हिसकावून घेऊ इच्छित आहेत. हेच कारण आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी लोकांकडून डावललं जात आहे.

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे व राहील. ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’(पीएजीडी) हे नॅशनल कॉन्फरस आणि इतर पक्षाचे मिळून बनलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुर्नप्रस्थापित करून राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी पीएजीडीची आहे.

अनुच्छेद ३७० ला पाठिंबा देण्यासाठी जो बहुपक्षीय निग्रह ४ ऑगस्ट रोजी दाखवण्यात आला, त्या निग्रहाला आणि त्या वेळी झालेल्या ठरावाला गुपकर ठराव असे संबोधले जाते. नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्षांच्या श्रीनगरमधील गुपकार येथील निवासस्थानी तो संमत झाला होता.

Protected Content