लखनऊत जाळली ‘पोलीस चौकी’

lucknow protest

 

लखनऊ वृत्तसंस्था । नागरिकत्व कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला उत्तर प्रदेशात हिंसक वळण लागले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये विविध भागांत हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून शहरातील पोलीस चौकीसह काही वाहनेही जाळण्यात आली आहेत. डालीगंज आणि हजरतगंज भागात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

यावेळी काही आंदोलकांनी मीडियाच्या ओबी व्हॅनलाही आग लावली. दुसरीकडे संभल येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आले आहे. लखनऊमधील डालीगंज परिसरात आंदोलकाकडून दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. हिंसाचार सुरु असल्याने पोलिसांकडून ठाकुरगंज येथे गोळीबार करण्यात आला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. आंदोलन सुरु असताना आंदोलकांनी पोलीस चौकीला लक्ष्य केले. मदेयगंज नंतर ठाकुरगंज येथील सतखंडा पोलीस चौकीला आग लावण्यात आली. यावेळी चौकीबाहेर उभ्या वाहनांना पेटवण्यात आले.

Protected Content