टी-20: महिला क्रिकेटपटू बेथ मुनीने नोंदविला विश्वविक्रम

ben muni

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सलामीवीर बेथ मुनी हिने श्रीलंकेविरुद्ध आज झालेल्या टी-२० सामन्यात ६१ चेंडूंत ११३ धावांची स्फोटक खेळी केली असून तिने तब्बल २० खणखणीत चौकार लगावत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवीन विश्वविक्रम नोंदविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेथ मुनीच्या स्फोटक शतकी खेळीने ऑस्ट्रेलियानं २० षटकांत चार गडी गमावून २१७ धावांचा डोंगर उभा केला. तिनं अवघ्या ५४ चेंडूंत शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे या शतकी खेळीत तिनं एकही षटकार लगावला नाही. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मुनीनं स्वतःचा विक्रम मोडीत काढला. याआधी तिनं इंग्लंडविरुद्ध २०१७मध्ये १९ चौकार ठोकले होते. सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची मॅट लेनिंग दुसऱ्या स्थानी आहे. तिनं आयर्लंडविरुद्ध १८ चौकार तडकावले होते. विशेष म्हणजे मुनीनं या शतकी खेळीत एकही षटकार लगावला नाही. हा सुद्धा एक विक्रमच म्हणावा लागेल. ती टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकही षटकार न मारता शतक झळकावणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. तसंच मुनीचं हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं शतक आहे. याआधी तिनं इंग्लंडविरुद्ध ७० चेंडूंमध्ये १९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ११७ धावा केल्या होत्या.

Protected Content