‘स्वच्छ भारत मिशन’ बाबत जळगावात सोमवारी वक्तृत्व स्पर्धा

1swachhatbharatabhiyan 2

जळगाव, प्रतिनिधी | महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्ष व स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) व मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वाद-विवाद मंडळ यांच्या संयक्त विद्यमाने सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांसाठी मूळजी जेठा महाविद्यालयात जिल्हास्तरीय “वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना विद्यार्जनासोबत सामाजिक भान आणि व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. त्यांनी विविध विषयांवर वाचन, चिंतन व प्रकटीकरण करावे.  त्यातून त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढावी. त्यांचा विचार व कृतीने स्वच्छतेच्या,  प्लास्टीक बंदीच्या सेवाभावी कार्यात सहभाग वाढावा हा उद्देश स्पर्धेमागे आहे. या स्पर्धेकरीता प्लास्टीक मक्त परिसर : माझे प्रयत्न , ‘स्वच्छता ही सेवा’ मंत्राचे आम्ही पाईक , सावध ऐका निसर्गाची हाक असे विषय असणार आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक : ५००१/- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक : ३००१ /- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक २००१/- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ (२) प्रत्येकी १००१/- व प्रमाणपत्र अशा स्वरुपाची बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटनषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते होणार असून बक्षिस वितरण जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, पुणे येथील प्रसिध्द वक्ते डॉ. महेंद्र ठाकूरदास, केसीई सोसायटीचे प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर आणि प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

Protected Content