जुन्या वादातून चौघांकडून तरूणावर लोखंडी पट्टीने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर घरी जात असलेल्या तरूणाला जुन्या वादातून चौघांनी लोखंडी पट्टीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कांचन नगरातील पार्वताबाई ओक नगरात तेजस दिलीप सोनवणे हा वास्तव्यास आहे. तेजसचे प्रथम व सिद्धू सोबत पुर्वीपासून वाद आहेत. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तेजसविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलाविले होते. त्यानुसार तेजस हा वडील व मित्र खुशाल पितांबर सोनार याच्यासोबत गेला होता. चौकशी झाल्यानंतर तेजस व खुशाल हे दोघ दुचाकीने काट्याफाईलमधून जात असतांनाच त्याठिकाणी प्रथम, सिद्धू, यश राजू पाटील व राकेश सोनवणे उर्फ लिंबू राक्या त्याठिकाणी आले. त्यांनी तेजसची दुचाकी थांबवित त्याला शिवीगाळ चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. मारहाणीत प्रथम याने त्याच्या हातातील लोखंडी धारदार पट्टीने तेजसच्या डोक्यावर वार करीत त्याला गंभीर जखमी केले. तेजसचा मित्र खुशाल हा पोलिसांना बोलविण्यासाठी गेला असता त्यठिकाणाहून मारहाण करणारे पळून गेले. जखमीवर  शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी खुशाल सोनार याच्या फिर्यादीवरून चौघांवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content