आरपीएफ कॉन्स्टेबलचा टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार

Rape2 678x381

 

मुंबई (वृत्तसंस्था) आरपीएफ कॉन्स्टेबलने चक्क टॅक्सीचालकावर जबरदस्ती करत, अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे वेश्या वस्तीत टॅक्सी नेण्यास विरोध केल्याने, कॉन्स्टेबलने थेट टॅक्सीचालकावरच अनैसर्गिक कृत्य केले.

या संदर्भात अधिक असे की, आरोपी कॉन्स्टेबल 11 जानेवारीला रात्री 11 वाजता ड्युटी करुन आल्यानंतर त्याने टॅक्सीचालकाला टॅक्सी डिमेलो रोडकडे नेण्यास सांगितले. परंतू टॅक्सीचालकाने टॅक्सी ग्रॅण्टरोडवरील वेश्या वस्तीत नेण्यास नकार दिला. यावर भडकलेल्या कॉन्स्टेबलने चालकास बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर, आरोपी कॉन्स्टेबलने टॅक्सी चालकाला रेल्वेच्या हद्दीत नेऊन, अनैसर्गिक कृत्य करत बलात्कार केला. याशिवाय कॉन्स्टेबलने त्याचे पैसे आणि चावीही काढून घेतली. गुन्हा दाखल होताच एमआरए मार्ग पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. त्याच्याविरोधात कलम 377 अनैसर्गिक कृत्य, कलम 394 लूट यासह कलम 387,341,324,504 आणि 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content