शेअर बाजारात तेजी कायम

share market

मुंबई प्रतिनिधी । गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा सुरूच ठेवल्याने गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजीची दौड कायम राहिली. आज दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११५ अंकांनी वधारून ४१ हजार ६७३ अंकांवर बंद झाला असून सलग तिसऱ्या सत्रात निर्देशांकाने तेजीसह नवा विक्रमी स्तर गाठला आहे.

आजच्या सत्रात अपेक्षेप्रमाणे टाटा समूहातील कंपनीच्या शेअरवर दबाव दिसून आला. राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादाने सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निकाल दिला. यामुळे टाटा समूहातील शेअर्सची गुंतवणूदारांनी विक्री केली. बुधवारी टाटा समूहातील टाटा मोटर्स, टाटा बेव्हरेज, टाटा कम्युनिकेशन यासारखे महत्वाचे शेअर कोसळले होते. आज टाटा मोटर्स आणि टीसीएस या शेअरमध्ये वाढ झाली. मात्र टाटा केमिकल, टाटा कॉफी, टाटा मेटॅलिक, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स हे शेअर घसरणीसह बंद झाले. येस बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, बंधन बँक, आयशर मोटर्स, एनएमडीसी, आयडीएफसी फर्स्ट बँक, एसबीआय, कोटक बँक हे शेअर वधारले. वेदांता, एचडीएफसी, सन फार्मा, इंडसइंड बँक, इंडियन बँक, इंटरग्लोब एव्हिएशन, नेस्को, गुजरात गॅस, भारत हेवी इलेक्ट्रिकल, टीव्ही १८ ब्रॉडकास्ट, ज्योती लॅब, पीएनबी हौसिंग फायनान्स, जेके सिमेंट या शेअरमध्ये घसरण झाली.

Protected Content