ईडी सरकार लवकरच ‘रन आऊट’ होणार : तपासे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

कमी बॉलवर जास्त रन काढण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच केले होते. यावरूनच राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ते म्हणाले की, राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण स्वीकारले जात नाही ना अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी ’बुलेट ट्रेन’ चा निर्णय तत्परतेने घेतात. परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत. एकीकडे सरकारचा न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर ‘सी वोटर’ चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्वे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे. याचमुळे कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात हे ईडी सरकार लवकरच ‘रन आउट’ होईल, असा टोला महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Protected Content