बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप (व्हिडीओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – केंद्र सरकारच्या बीएसएनएल कर्मचाऱ्यांतर्फे सहकारी उद्योगांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात २८ मार्च पासून दोन दिवसीय संप पुकारला आहे.

मुंबई व उपनगरात एमटीएनएल तर पुणे नाशिकसह अन्य लहान मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बीएसएनएल कार्यरत आहे. केंद्र सरकारकडून या सरकारी उद्योगांचे टप्प्याटप्प्याने खाजगीकरण केले जात आहे. दूरसंचार क्षेत्रात अन्य खाजगी कंपन्याची मक्तेदारी वाढत असून या खाजगी कंपन्याकडून ३ जी,४ जी. ५ जी अशा सेवा ग्राहकांना दिल्या जात आहेत. परंतु बीएसएनएल मात्र अजूनही आधुनिकीकरण ३ जी वरच असून खाजगीकरण करीत आहे. बऱ्याच ठिकाणी बीएसएनएलचे टॉवर खाजगी कंपन्यांना विक्री केले जात आहे. टॉवर, ओप्तीकाल फायबरची विक्री रद्द करा, कामगार विरोधी कायदे रद्द करा, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यासाठी पेन्शन रिविजन लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनाची थकबाकी देण्यात यावी, यासह अन्य न्याय्य मागण्यासाठी बीएसएनएल कर्मचारी वर्गातर्फे दूरसंचार निगम कार्यालयासमोर घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव निलेश काळे, शशिकांत सोनवणे, एम.डी.बढे, शालिक पाटील, मीरा महाजन, जयश्री पाटील, बी.पी,सैंदाणे, ए.एस.चौधरी, प्रदीप चांगरे, नामदेव पाटील आदी कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/348055350613407

 

Protected Content