‘त्या’ महिलेचा खूनच : पोलिसांनी केला उलगडा

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव शिवारात विहिरीत महिलेला ढकलून देवून तिला जीवे ठार मारणाऱ्या संशयित आरोपीला पोलीसांनी बारा तासाच्या आत जेरबंद केले आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, अफसानाबी गुलाम इंद्रिस (वय-४२) रा. हजरत भिलाल मस्जिद, बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) या महिलेने संशयित आरोपी शेख गुलाम इंद्रिस गुलाम हुसैन (वय-४५) रा. हरीपुरा, बऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) यांच्याकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावला होता. वारंवार लग्नाची मागणी होत असल्याच्या कारणावरून अफसाणाबी या महिलेला मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे शिवारातील रविंद्र पोहेकर यांच्या शेतातील विहिरीत संशयित आरोपी शेख गुलाम इंद्रिस गुलाम हुसैन याने ढकलून दिले. महिला विहिरीत पडल्याने तिने आपला जीव वाचविण्यासाठी विहिरीतील विद्यूत मोटारीच्या पाईपाला पकडून धरले होते. ती बाहेर येवू नये म्हणून संशयित आरोपीने मोटारीचा पाईप व वायर कापून तिला पाण्यात बुडवून जीवे ठार केले होते. २७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 

मुक्ताईनगर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या बारा तासात संशयित आरोपीला अटक केली. महिलेचा भाऊ शेख फरीद शेख मुसा यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात आरोपी शेख गुलाम इद्रीस गुलाम रा. हरिपुरा बऱ्हाणपूर मध्यप्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश मनुरे, पोना संतोष नागरे, मोतीलाल बोरसे, सुरेश पाटील अशांनी आरोपीस बऱ्हाणपूर येथून ताब्यात घेतले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!