काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष चंदन पाटील यांच्या राजीनाम्याने खळबळ

chandan patil

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे धरणगाव तालुकाध्यक्ष चंदन पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा
दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने मतदारसंघात खळबळ उडाली असून त्यांच्या पुढल्या राजकीय भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भूमिकेमुळे या मतदारसंघात विजयासाठी अटी-तटीची लढत होणार हे मात्र नक्की.

 

विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी त्यांनी केलेली होती, मात्र ती मागणी मान्य न झाल्याने नाराज होवून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे. चंदन पाटील हे काँग्रेसचे प्रदेश चिटणीस डी.जी. पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी ऐन निवडणुकीत आपले पद सोडल्याने महाआघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहेच. त्यातच पद सोडल्यानंतर ते काय भूमिका घेतात ? कोणत्या पक्षात जातात किंवा कुणाला पाठींबा देतात, यावर त्यांच्या निर्णयाचा कुणाला लाभ होणार आणि कुणाला फटका बसणार ते ठरणार आहे. त्याचवेळी ते भाजपात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. तसे झाल्यास शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्यापुढे आव्हान उभे करणाऱ्या भाजपच्या बंडखोर उमेदवाराचे म्हणजे चंद्रशेखर अत्तरदे यांचे बळ वाढणार असून ना. पाटील यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Protected Content