शिर्डीच्या नवसंकल्प शिबिरात कव्वाली कार्यक्रम ठेवा- आशिष देशमुख

नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी एका जागेवर परराज्यातील इम्रान प्रतापगढी यांना राज्यातून उमेदवारी देण्यात आली, यावरून शिर्डीत आगामी होणाऱ्या नवसंकल्प शिबिरात कव्वालीचे कार्यक्रम ठेवा अशी तिखट प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आ.आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

राज्यसभेसाठी नेहमीप्रमाणे कॉंग्रेसने राजस्थानातील इम्रान प्रतापगढी यांना उशिराने उमेदवारी जाहीर केली. यावरून राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या नगमा यांची गेल्या अनेक वर्षांची तपस्या कमी पडली असे म्हणत काँग्रेसमध्ये अनेकजण नाराज झाले आहेत.

महाराष्ट्रात अनेक सक्षम उमेदवार असताना राज्याबाहेरील उमेदवार दिला आहे. काँग्रेस एका अल्पसंख्याक उमेदवाराला राज्यातील एका जागेवरून राज्यसभेसाठी संधी देणार होते. यात दोन नावांवर सहमती असली तरी प्रियांका गांधी याच्या हस्तक्षेपानंतर राजस्थानातील इम्रान प्रतापगढी यांना राज्यातून उमेदवारी देण्यात आली. यावरून महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांना संपर्क साधून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

कॉंग्रेसच्या एका जागेवर उमेदवार निवडून येऊ शकतो, आणि या जागेसाठी राज्यातील अनेक जण इच्छुक होते. या सर्वाना डावलत बाहेरील उमेदवार दिला यावरून नाराजी व्यक्त करीत कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आ.आशिष देशमुख यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. राजीनामा दिला असला तरी पक्षासाठी काम करीत राहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

Protected Content