सुजात कासोदे याचे नीट परीक्षेत यश

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | येथील संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी सुजात प्रदीप कोसोदे याने NEET या MBBS प्रवेशासाठीच्या पात्रता परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केल्याने त्याचे तसेच शिक्षकांचे कौतुक होत आहे.

 

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा सुजात प्रदीप कोसोदे विद्यार्थी असून त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे तसेच त्याचे आई-वडील प्रदीप कोसोदे व सुजाता कोसोदे यांचे अभिनंदन विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, प्रा. डॉ. संजय शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आय डी पाटील, ज्युनियर सायन्स विभागाचे प्रभारी प्राचार्य विनोद परिहार, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एन डी काटे, भाऊसाहेब श्री एस आर पाटील आणि सर्व कर्मचारी यांनी केले आहे.

Protected Content