रामरोटी आश्रमतर्फे वंचितांना किराणा कीटचे वाटप

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | प. पु. गुरुवर्य संतरामभाऊ पुजारीबाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रम या सेवाभावी संस्थेकडून गरीब, वंचितांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा कीटचे वाटप करण्यात आले.

 

प. पु. गुरुवर्य संतरामभाऊ पुजारीबाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रम या सेवाभावी संस्थेकडून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यानुसार सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा प्रत्येकी एक किलो पिठी साखर, तेल, तुप, रवा, मैदा, बेसन पिठ, आदी किराणा साहित्याची वाटप समाजातील वंचित निराधार खान्देश अंधकल्यान संघ जळगाव येथील दिव्यांग (अंध) गोर-गरीब व परिसरातील मंदीरावरील महाराज असे १११ कुटुंबाला वाटप करुन त्यांचेही चेहर्‍यावर प्रेमळ हास्य फुलवुन त्यांची सुध्दा दिवाळी आनंदीत केली. दिवाळी सणाच्या निमित्ताने अन्नदाते पं. स. सभापती विकास पाटील , राजु साहेबराव पाटील शेमळदे, संदीप खरे (गणेश झेरॉक्स), डॉ. दिलीप भास्कर तायडे, डॉ. गणेश माधव येवले नाशिक , संतोष पाटील शेमळदा सोसायटी, गवळे मॅडम एआर ऑफीस, जी.के. महाजन (जिल्हा बँक), प्रदिप चौधरी (जिल्हा बँक), प्रमोद भारंबे , के. डी. पाटील, श्री. जाट , श्री. झांबरे डी.ओ.बॅंक, मनोज भुजंगराव देशमुख, प्रमोद पाटील मलकापूर, चुन्नीलाल सोनवणे कर्की सोसायटी, संयम मेडिकल, श्रीपाद डिजिटल एक्सरे, व सामाजिक बांधिलकीची जान असणारे ज्ञात अज्ञात दानवीरांकडुन आणि रामरोटी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करुन वाटप करण्यात आले. यावेळी महंत आजादगिरी महाराज, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, एपीआय श्री काकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे , डॉ. एन. जी. मराठे, डॉ. दिलीप तायडे, डॉ. तुषार पाचपांडे, अध्यक्ष किशोर गावंडे.,सचिव रामभाऊ टोंगे, उपाध्यक्ष गजमल पाटील, गणेश मनुरे, हभप रतीराम महाराज, रघुनाथ पाटील, प्रमोद गावंडे, पटेल सर, सुभाष माळी, किरण महाजन, सुभाष सोनवणे, जगदीश निकम, वसंता पाटील, नामदेवराव काटे, महाविर बोथरा, शुभम तळेले, विनायक वाडेकर सर, संदीप जोगी, धनंजय सापधरे, डी. एम पाटील, गौरव बाभुळकर, व रामरोटी परिवारचे सेवक उपस्थित होते.

Protected Content