लष्कर-ए-तोयबाचा टॉप कंमांडर सैफुल्लाह ठार

श्रीनगर: वृत्तसंस्था । श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कंमांडर सैफुल्लाह ठार ढाला आहे. सैफुल्लाह पाकिस्तानी नागरिक होता. मारला गेलेला दुसरा दहशतवादी इर्शाद पुलवाम्याचा रहिवासी आहे. परिसरात सुरक्षादलाची शोध मोहीम सुरू आहे.

पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानचा दहशतवादी सैफुल्लाह याच्यासोबत लश्कर-ए-तोयबाशी संबंधित स्थानिक दहशतवाद्याला घेरण्यात आले होते. सैफुल्लाह सप्टेंबरमधील आणि नौगाम येथील सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. यात दोन जवान शहीद झाले होते.

सैफुल्लाह सीआरपीएफला निशाणा बनवत असे. नौगाम, चंडूरा, पंपोरमध्ये सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्यात सैफुल्लाहचा सहभाग होता. या वर्षी दहशतवाद्यांच्या विरुद्ध एकूण ७५ मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यांमध्ये १८० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. श्रीनगर जिल्ह्यात आता एकच दहशतवादी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे.

सुरक्षादलांना परिसरात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. शोध मोहीम हाती घेण्यात आली. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षादलांच्या जवानांनी देखील प्रत्युत्तर दिले.

जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ संयुक्त पथक दहशतवादी लपलेल्या भागात पोहोचताक्षणी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.शनिवारी कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलांच्या जवानांशी झालेल्या चकमकीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ४ दहशतवादी मारले गेले. शुक्रवारी रात्री उशिरा त्या परिसराला घेरत सुरक्षादलांनी शोधमोहीम राबवली होती.

Protected Content