कर्मकांडापेक्षा निस्वा:र्थी जनसेवा हीच खरी ईश्वर पुजा : प्रेमकुमार अहिरे

जळगाव, प्रतिनिधी । ” कर्मकांडांपेक्षा नि:स्वार्थी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा ” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी केले. वलवाडीस्थीत निसर्ग मित्र समिती कार्यालयात कोराना योद्धा सन्मान प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जिल्हा प्रवक्ते प्राध्यापक डॉ. प्रविणसिंह गिरासे असून प्रमुख अतिथी सर्वश्री आर .आर. सोनवणे, समितीचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष सुनील कापडणीस, कै .कविवर्य नीळकंठ महाजन स्मृती प्रतिष्ठान ,जळगाव माजी अध्यक्ष विजय लुल्हे, वृक्षमित्र शशिकांत शिंदे (सटाणा) आदी मान्यवर उपस्थित होते. विजय लुल्हे मार्गदर्शन करतांना सांगितले की ,” व्रतस्थ समाजसेवक पंकज नाले यांचा नि:स्वार्थी परोपकार हा कर्तव्य भावनेतून असल्याने तो संतांच्या जातकुळीचा असून त्याला अध्यात्माचा परिसस्पर्श लाभला आहे .” जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंकज नाले यांनी कोवीड महामारीच्या काळात जेव्हा रक्ताचे नातेवाईक तोंड लपवतात अशा परिस्थितीत निर्भय योद्ध्याप्रमाणे सतत चार महिने बेसहारा दोनशे व्यक्तींना सकाळ – संध्याकाळ अन्नदान केले . एकूण चार जनजागृती आरोग्य शिबिरे घेतली. जळगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालये त्यांनी मोफत सॅनेटरायझेशन करून दिले . जीवाची पर्वा न करता डॉक्टर ,पोलीस, शिक्षक यांनी अतुलनीय कार्य केले अशा तब्बल चारशे सेवाव्रती मंडळींना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

नाले यांच्या व्यापक व कालसुसंगत समाजकार्याची माहिती विजय लुल्हे यांनी दिली. पंकज नाले यांच्या अतुलनीय व्रतस्थ समर्पित कार्याची विशेष दखल घेऊन निसर्ग मित्र समिती, धुळेतर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र समितीचे जिल्हा प्रवक्ते डॉ .प्रविणसिंह गिरासे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले . याप्रसंगी प्रेमकुमार अहिरे यांनी नाले यांना वृक्षदान करीत संस्थेने महिलादिना निमित्ताने प्रकाशित केलेला विशेषांक , शिवरायांचे आज्ञापत्र देऊन कार्याला शुभेच्छा दिल्या . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्ताने विजय लुल्हे यांनी स्वतः प्रकाशित केलेल्या महात्मा गांधीजी प्रणीत ” सात सामाजिक पातके ” व ” एकादश व्रते ” पोस्टर्स व गांधीजी यांच्यावरील लोकराज्य मासिकाचा ” युगपुरुष ” विशेषांक उपास्थित मान्यवरांना भेट दिला . सत्कारार्थी पंकज नाले यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले .अध्यक्षीय भाषणात डॉ . प्रविणसिंह गिरासे यांनी थोर संतांचे पर्यावरण विषयक विचार मांडले .तसेच स्वामी विवेकानंद यांनी युवा पिढीला दिलेली कालातीत संजीवक दिपस्तंभासमान राष्ट्रीय मूल्ये सोदाहरण सांगितली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निसर्ग अहिरे यांनी मानले.

Protected Content