कोरोनामुळे यावल अभयारण्य पर्यटकांसाठी बंद

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील सातपुड्यातील अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती यावल येथील उपवनसरंक्षक आश्विनी खोपडे यांनी दिली आहे .

यावल तालुक्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वतातील १७५ चौरस किलो मीटरचे क्षेत्र यावल अभय अरण्य म्हणून घोषीत केलेले आहे. जळगाव जिल्ह्यायासह राज्यातील वन्य व निर्सगप्रेमीअभय भ्रमणासह अरण्यात विविध स्थळी भेटी देतअसतात . यावल अभय अरण्यातील पाल रेंज क्षेत्रातील धन्वंतरी उद्यान, व्हयु पॉईंट, सुकी धरण क्षेत्र , जामन्या रेंज मध्ये ब्रिटीश कालीन मयुर कुटी, वाकीचे जंगल लंगडा आंबा यासह अनेक नयनरमण्य स्थळ आहेत. वन्यप्रेमी पा्रणी, पक्षी निरीक्षणासह वनभ्रमंतीसाठी भेटी देत असताता मात्र गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणु महामारी संसर्गाच्या पार्श्श्वभुमीवर वनविभागाने पर्यटनासाठी हे संपुर्ण क्षेत्र बंद केले आहे.गर्दिपासून अलीप्त राहण्याची भावना असलेल्या निर्सगआणी वन्यप्रेमींचा वनभ्रमणाचाही आनंद कोरोनाच्या महामारीने हिसकावला असल्याने वन्यप्रेमींनाही आपल्या घरातच विलगीकरण होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या नागरी आरोग्य  सुरक्षेच्या कारणामुळे  अभयरण्यात हे पर्यटन क्षेत्र वन्य व निर्सगप्रेमींसाठी कोरोनाचा उच्चाटन होईपर्यंत बंद राहणार असल्याचे वृत्त आहे , याची नोंद नागरीकांनी घ्यावी असे आवाहन अभयरण्याच्या उपवनसंरक्षक अश्वनी खोपडे यांनी केले आहे .

Protected Content