अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अमोल कोल्हे

जळगाव, प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ते अमोल अशोक कोल्हे यांची अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी व मेहरूण भागातील सामाजिक कार्यकर्ते अतुल सुरेश महाजन यांची महानराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष .प्रदिपभाऊ (बंडू )भोळे यांनी नियुक्ती पत्र देऊन ह्या नियुक्त्या केल्या.

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अमोल कोल्हे व महानगराध्यक्षपदी अतुल महाजन यांच्या नियुक्त्यांबद्दल केंद्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाशराव व्ही.पाटील, कार्याध्यक्ष अजय भोळे, उपाध्यक्ष राजेश चौधरी, सचिव नितीन भोगे, परेश कोल्हे, परिक्षीत बऱ्हाटे, नितीन धांडे, लेवा पाटीदार ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष आर.एस.सावदेकर , बहिणाई ब्रिगेड च्या प्रदेशाध्यक्षा आशा कोल्हे, राजेंद्र चौधरी, गोपाळ खडके, निखील रडे, सुनिता लोखंडे, हर्षा बोरोले व महासंघाच्या इतर सदस्यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Protected Content