एमपीएससी परिक्षेत धनश्री पवार यांची नायब तहसीलदारपदी निवड

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्यसेवा परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून धनश्री पवार  यांची नायब तहसीलदार या पदासाठी निवड झाली आहे.

फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांचे  शालेय शिक्षण हे धुळे येथील जय हिंद हाय स्कूल येथे झाले. त्यांनी  NIT Nagpur  येथून  सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी प्राप्त केली आहे. काही वर्ष त्यांनी लार्सन अँड टुब्रो या कंपनी मध्ये जॉब केला. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर देखील जिद्द राखून अभ्यासामध्ये सातत्य ठेवत हे पद प्राप्त केले त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!