स्थानिकाना न दुखावता काँग्रेसने सर्वांना सोबत घेण्याची गरज – खा.संजय राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात काँग्रेसमध्ये तोलामोलाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची कमतरता नाही, पण राज्यसभेसाठी बाहेरचे उमेदवार  असल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्यामुळे स्थानिकाना न दुखावता काँग्रेसने सर्वांना सोबत घेण्याची गरज असल्याचे  खा.संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गेली अनेक वर्ष राज्यातून काँग्रेस पक्ष बाहेरची माणसे पाठवत आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी देशातले राजकारण पाहता काँग्रेसने या निवडणुकीत अत्यंत चाणाक्ष आणि सावधगिरीने पावले टाकायला हवी होती, असे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खा.संजय राऊत यांनी कॉंग्रेसने दिलेल्या उमेदवारीवर भाष्य केले आहे. राज्यसभा उमेदवारीवरुन काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. आणि खा. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याची चिन्हे दिसत आहेत.

महाविकास आघाडीत आम्हाला काँग्रेसची गरज असून काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात देशाचे नेतृत्व काँग्रेसने करावे, हे सांगणारे आम्ही असल्याचेही खा. राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Protected Content