Home प्रशासन पिचर्डे परिसरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यास सुरुवात !

पिचर्डे परिसरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यास सुरुवात !

0
105


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिचर्डे परिसरातील शेतजमिनी, उभी पिके तसेच नाल्यालगतच्या शेतांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांना सुरुवात केली आहे.

महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी योगेश पाटील, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सौरभ डुगर तसेच पिचर्डेच्या पोलीस पाटील श्रीमती चेतना पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतात जाऊन पंचनामे केले.

यावेळी प्रत्येक शेताची पाहणी करून माती वाहून जाणे, उभ्या पिकांचे नुकसान तसेच नाल्यालगतच्या शेतांतील हानीची सविस्तर नोंद करण्यात आली. शासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पंचनाम्याचे काम पारदर्शक व अचूक पद्धतीने करून नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

पंचनाम्यावेळी शेतकरी विनोद बोरसे, रावसाहेब पाटील, राजेंद्र पाटील, रमेश कुंभार, प्रविण कुंभार, शंकर महाजन, दीपक पाटील, अक्षय सपके यांच्यासह पिचर्डे परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound