डॉ. संभाजीराजे पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दाखल !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ख्यातनाम वैद्यकीय व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. संभाजीराजे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असून यामुळे येथील राजकीय समीकरणांची स्थिती रंगतदार होण्याचे संकेत मिळाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे च्या सामाजिक न्याय विभागाच्या संविधान मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

या भव्य अश्या कार्यक्रमात डॉ संभाजीराजे पाटील यांच्यासह पारोळा, एरंडोल, भडगाव कासोदा येथील विविध क्षेत्रातील २६२ सदस्यांनी यावेळी जाहीर प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरात डॉ संभाजीराजे आलेत हा योगायोग उत्तम आहेत आता तुम्ही घोडदौड सुरू ठेवा आम्ही आपल्या पाठीशी खंबीर उभे आहोत अश्या शब्दात अजित दादा यांनी सांगितले. प्रवेश सोहळ्यास महिलांची विशेष उपस्थिती बघून रुपाली ताई चाकणकर यांनी विशेष कौतुक केले, लवकरच या सर्व महिला कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पारोळा येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रूपालिताई चाकणकर, आमदार अमोल मिटकरी, जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय पवार, सामाजिक न्याय विभाग सुनील मगरे एरंडोल तालुका अध्यक्ष अमित पाटील, रमेशबापू पाटील, प्रदेश सरचिटणीस युवक कॉंग्रेस किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. संभाजीराजे पाटील हे विधानसभेची तयारी करत असल्याची चर्चा सुरू असतांनाच झालेला हा प्रवेश लक्षणीय मानला जात आहे.

Protected Content