ब्रेकींग : तीन गावठी पिस्तूल आणि ८ जीवंत काडतूसासह तिघे पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे रोडने कारमधून ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूसा सह चोपडा ग्रामीण पोलीसांनी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. ही कारवाई शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता केली. त्यांच्याकडून ८ लाख ८२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती जळगाव मुख्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधगाव येथे एका कारमधून काही जण अंधाराचा फायदा घेत २ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली .त्यानुसार पथकाने शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे सापळा रचला. त्यावेळी पोलिसांनी कार क्रमांक (एमएच-१२ आरएफ १४९६) ही कार थांबविली. कारची झाडाझडती घेतल असता तिन जणांकडून ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस आढळून आले. पोलीसांनी तिघांना अटक केली. पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा एकुण ८ लाख ८२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकणी जफर रहीम शेख वय-३३, तबेज ताहीर शेख व-२९ आणि कलीम अब्दुल रहमान सय्यद वय-३४ तिघे रा. शिरूर जि.पुणे यांच्याविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली यशस्वी कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कावरी कमलाकर, पोलीस नाईक शशिकांत पारधी, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण धनगर, सहायक फौजदार राजू महाजन, देविदास ईशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पारधी, विनोद पवार, महेंद्र भिल, संदीप निळे, श्रावण तेली, संजय चौधरी यांनी केली.

Protected Content