वाढदिवसानिमीत्त डॉ. उल्हास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव !

पीआयसीयू विभागाचे लोकार्पण ; रक्तदान शिबीर, शस्त्रक्रिया अभियानास प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त पीआयसीयू या नवीन बालरोग विभागाचे शुक्रवारी डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच शस्त्रक्रिया पंधरवडा अभियानासही प्रारंभ करण्यात आला. समाजोपयोगी उपक्रमातून डॉ.उल्हास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचा आज ६४ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पहाटे डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती गोदावरी पाटील यांचे आशीर्वाद घेतले. तसेच यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील आणि कुटुंबियातील सदस्यांनी ६४ दिव्यांनी डॉ. उल्हास पाटील यांचे औक्षण केले. सकाळपासूनच डॉ. उल्हास पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी झाली होती.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, अनिल पाटील, सौ. अलका पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. सुरेखा बोरले, संचालिका डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील,सारा आणि किवा पाटील, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्ही.एच.पाटील, गोदावरी आयएमआरचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त केक कापण्यात आला.

रूग्णालयात पीआयसीयूसह नव्या वास्तूचे लोकार्पण
माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते पीआयसीयू या बालरोग विभागाचे तसेच अधिष्टाता कॅबीन आणि कराओके आणि सेल्फी पॉईटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बालरोग विभागाचे डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीवार यांच्यासह सहकारी उपस्थित होते. तसेच फिजीओथेरेपीच्या नव्या वास्तुचेही डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या नवीन प्रशासकीय कार्यालयाचेही उद्घाटन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी व सहकारी उपस्थित होते. रूग्णालयातील अधिकारी अणि कर्मचार्यांनी देखिल डॉ. उल्हास पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कमल दृष्टी अभियानात मोतीबिंदूच्या ७४ शस्त्रक्रिया
डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कमल दृष्टी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात ७४ रूग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. यावेळी नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. नि.तु. पाटील, डॉ. निखील चौधरी, रेटीना तज्ञ डॉ. अश्विनी पाटील-नेहते यांच्यासह टीम उपस्थित होते. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांनी डॉ. उल्हास पाटील यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या.

वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. केतकी पाटील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गोदावरी आजी, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, अनिल पाटील, सौ. अलका पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. सुरेखा बोरले, संचालिका डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला वाढदिवसानिमीत्त डॉ. उल्हास पाटील यांनी केक कापून शुभेच्छांचा स्विकार केला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीतगायन, बहारदार नृत्य सादर केले. तसेच मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्या व्यक्तीमत्वावर कविता सादर केली. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड आणि नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ यांनी राम…सियाराम…सियाराम जय जय राम हे भक्तीगीत सादर केले. त्यानंतर डॉ. अनिकेत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजनंदिनी पाटील, उत्कर्ष भोसले, अपूर्वा पाटील आणि अथर्व देशमुख यांनी केले.

Protected Content