फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऐतिहासिक फैजपुर शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्या संदर्भात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
फैजपुर शहरातील समस्त बौद्ध समाज यांच्यातर्फे गेल्या तीन ते चार महिन्या पासून फैजपुर नगरपरिषदेसह जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन व स्मरण पत्रे देवूनही आतापर्यंत नगरपरिषदेने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. उलट निधी नसल्याचे सांगितले जाते. पुतळ्याला चाळीस वर्षे उलटले असून पुतळा जीर्ण झाला आहे. एखाद्या वेळेस अभिवादन व माल्यार्पण करतांना तसेच साफसफाई करतांना पुतळ्याची विटंबना होऊ शकते, पुतळ्याची झीज झाल्याने पुतळ्याचे अवयव तुटून पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याला जबाबदार कोण राहील याचे उत्तर नगरपरिषदेने द्यावे, तसेच एवढा मोठा संवेदनशील विषय असतांना सुद्धा फैजपुर नगरपरिषदे जवळ इतर कामांसाठी निधी उपलब्ध आहे.
परंतु भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध नाही. यावरून कळते की, फैजपुर नगरपरिषद किती जातीवादी भूमिका घेत आहे याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी भेट घेऊन संबंधित विषयावर चर्चा करून समस्त बौद्ध समाजाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. लवकरच नगरपरिषदेला पत्र व आदेश देऊन काम मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. निवेदन देते वेळी फैजपुर येथील भिमपुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पप्पु मेढे, रोहित मेढे, कुणाल मेढे, राजु वाघ, उदय तायडे यांच्या सह भिम सैनिक उपस्थित होते.