विद्यार्थ्यांना “युथ इनोव्हेशन ॲण्ड स्टार्ट अप” डॉ.परदेशी यांचे मार्गदर्शन

 

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भरारी फाउंडेशन, आयक्यूएसी विभाग व करियर गायडन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “युथ इनोव्हेशन्स ॲण्‍ड स्टार्ट अप” या विषयावर डॉ. युवराज परदेशी यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या. कार्यक्रमात दीपक परदेशी, तुषार भामरे व मोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी ग्रामीण भागातील युवकांमध्ये सुप्त गुणांना चालना देण्यासाठी भारत सरकारने स्टार्ट अप्स च्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली असून संधीचे सोने करावे असे प्रतिपादन केले.

डॉ.परदेशी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, स्टार्ट अपमुळे आजचा युवक स्वतःच्या पायावर उभा राहून रोजगार संधी उपलब्ध करू शकतो. त्यामुळे स्वयंरोजगार व उद्योजकता वाढू शकते असे मार्गदर्शन केले. दीपक परदेशी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील समस्या दूर करण्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी मदत करू असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय पाटील यांनी केले तर आभार प्रा. एम.डी. खैरनार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आय क्यू एसी समन्वयक डॉ. एच. जी. भंगाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. डी. पवार, प्रा.मनोज पाटील, प्रा. अरुण सोनवणे, प्रा. इ. आर. सावकार, प्रा. संजीव कदम, प्रमोद कदम, डी डी चौधरी, ए बी पाटील, अनिल पाटील, संतोष ठाकूर, साहेबराव अहिरे, राजाराम पाटील, प्रमोद जोहरे, डी डी पाटील, प्रमोद भोईटे आदी यांनी सहकार्य केले.

Protected Content