आ. शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन स्पर्धा परिक्षेचे आयोजन

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी)। आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त  धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात २२ मे रोजी ऑनलाईन स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त २३ मे रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मुधकरराव चौधरी महाविद्यालयात ८, ९ आणि १० वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा परिक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार संघाच्या सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना संबंधित ऑनलाईन स्पर्धेची लिंक व्हॉटस्ॲपवर पाठविण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांनी संबंधित वर्गाच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली जाणार आहे.  

अस राहतील स्पर्धेचे नियम

१) सदर स्पर्धा परीक्षा हि फक्त रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील इयत्ता ८, ९ व १० वी वर्गाच्या (State Board व CBSE) विद्यार्थांसाठीच असणार आहे.

२) प्रश्नपत्रिका हि मराठी व इंग्रजी भाषेत विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित बहुपर्यायी स्वरूपाची असेल व प्रत्येकी २ गुण असलेले एकूण ५० प्रश्न असतील.

३) परीक्षेचा कालावधी १ तासाचा (११ ते १२ वा.) असेल.

४) स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

५) स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थांना अनुक्रमे रूपये  ५०००, ३००० व २००० चे बक्षीस दिले जाणार आहे.

सहभागी विद्यार्थांना Online प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सदर स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालय प्राचार्य राजेंद्र वाघुळदे यांनी केले आहे.

Protected Content