ग्रामपंचायतीच्या अनियमिततेच्या चौकशीसाठी आमरण उपोषणाचा इशारा

यावल-लाईव्ह ट्रेंडस  न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस सन २०२० पासून आलेल्या विविध निधी अंतर्गत आलेली अनियमिता  व अपहार केल्याच्या तक्रारी गेल्या १० महिन्यात वेळोवेळी करून ही त्या संदर्भातील चौकशी होत नसल्याने येथील पंचायत समितीचे माजी गटनेते (काँग्रेस) शेखर सोपान पाटील व त्यांच्या सोबत सावखेडा सिमगावाचे ग्रामस्थ हे येत्या १४ ऑगस्टपासून येथील पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा शेखर पाटील यांनी गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना दिलेल्या  निवेदनात  दिला आहे.

यावल तालुक्यातील,सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस आलेल्या वेगवेगळ्या निधीचा अनियमित उपयोग तसेच निधीचा अपहार करण्यात आल्याची तक्रार पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी येथील गटविकास अधिकारी यांचेकडे करत १४ ऑगस्ट पासून ग्रामस्थांसह मागण्या मान्य होईस्तोवर उपोषणास बसणार असल्याचा  इशारा देत उपोषण काळात उपोषणकर्त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्या प्रशासन जबाबदार राहील असेही    निवेदनात नमूद केले  आहे.

दिलेल्या निवेदनात   ग्रामपंचायत सावखेडा येथील सन २०२० पासून तर आज पर्यंत आलेल्या पंधराव्या वित्त आयोगातील कामाचे अनियमित टेंडर व अनियमित कामांची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करणे , तसेच ग्रामनिधी पाणीपुरवठा निधीमध्ये झालेल्या अपहारास कारणीभूत असलेल्यां वर तात्काळ कार्यवाही करणे, त्याचप्रमाणे एकाच ठेकेदारास बेकायदेशीर कामे दिल्याने दोषी असलेल्या ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.

Protected Content