मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थित अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर-अमळनेर मतदारसंघात ना.अनिल पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून भाजपा तसेच इतर पक्षात गेलेले  असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत म्हणजेच स्विगृही परतले आहेत.

तालुक्यातील सात्री येथील माजी सरपंच महेंद्र शालीग्राम बोरसे तसेच पाडळसरे येथील सामजिक कार्यक्रते व सरपंच पती सचिन योगराज पाटील हे देखील स्विगृही परतत मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.सात्रीचे माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी याआधी अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळली होती. त्यांच्या राष्ट्रवादीत इंनकमिंग मुळे युवा कार्यकर्ते तसेच मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Protected Content