बीएचआर घोटाळा : वॉरंट रद्द करून कंडारेचा अटकपूर्व साठी अर्ज

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी Bhr Scam तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याने आपल्याला फरार घोषीत होण्यासाठी काढण्यात आलेले वॉरंट रद्द करून अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

बीएचआर सहकारी पतसंस्था घोटाळ्यातील Bhr Scam प्रमुख संशयित असणार्‍या सुनील झंवरने फरार घोषीत होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीत न्यायालयाला शरण जात आपला वॉरंट रद्द करून घेतला होता. यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्याला खालील कोर्टात जाण्याचे नमूद करत फटकारले होते.

दरम्यान, सुनील झंवर याच्याच प्रमाणे आता पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याने देखील न्यायाललयात आपला वॉरंट रद्द केला आहे. यानंतर त्याने देखील तात्काळ जामीनासाठी अर्ज दाखल केला असून यावर उद्या म्हणजे २४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे कामकाज पाहणार आहेत.

Protected Content