यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फौंडेशन, कोरपावली ग्रामपंचायत व महेलखेडी ग्रामपंचायतयांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद गटनेते तथा यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रथम महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून रक्तदान शिबीराची सुरवात करण्यात आली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच विलास अडकमोल यांनी स्वतःह रक्तदान करून केली. यावेळी काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी जावरे, उपसरपंच हमीदाबी पटेल, माहेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी, उपसरपंच माया महाजन, काँग्रेस सेवा फौंडेशनचे यावल तालुका मिडियाप्रमुख विक्की पाटील, समाजसेवक मुक्तार पटेल, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, पराग महाजन, जयंता महाजन, ग्राप सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, अमोल नेहेते, सिकंदर तडवी, जुंमा तडवी, प्रवीण अडकमोल, जयवंत अडकमोल, भीमराव इंधटे, आशा वर्कर हिराबाई पांडव, नजमा तडवी, अंगणवाडी सेविका अलका महाजन, निशा तडवी, मालती नेहेते, लता अडकमोल, ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी यांनी परिश्रम घेतले. रेडप्लस ब्लड बँकेचे डॉ. भरत गायकवाड, डॉ. अमोल शेलार, डॉ. रविंद पाटील, डॉ. सलमान पटेल आदींनी तपासणी करून रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदविला .