कळमोदा येथे स्वर्गरथाचे लोकार्पण

 

रावेर : प्रतिनिधी । तालुक्यातील कळमोदा  येथे १३ एप्रिलरोजी गुढीपाडव्याच्या दिवशी स्वर्गरथाचे लोकार्पण शास्त्री भक्ती किशोरदास , नरेंद्रशेठ नारखेडे ( फैजपूर ) ,अरुण बाक्षे यांच्या हस्ते करण्यात आले

 

कळमोदा गावाची स्मशानभूमी  लांब असल्याने व कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने बऱ्याचवेळा मृतदेहांना खांदा द्यायला कोणी तयार होत नाही

या अडचणी लक्षात घेऊन कळमोदा येथील अमोल बाक्षे व परिवार यांच्यावतीने त्यांच्या मातोश्री स्व सौ नलिनी बाक्षे यांच्या स्मरणार्थ स्वर्गरथ विठ्ठल मंदिर ( कळमोदा ) यांना देण्यात  आला कळमोदा गावाला लागून असलेल्या खेड्यांवरसुद्धा आवश्यकता भासल्यास हा स्वर्गरथ सेवा म्हणून उपलब्ध करण्यात येईल

या प्रसंगी कळमोदा येथील भास्कर बोंडे, हेमराज बोंडे, हितेश बाक्षे, जगन्नाथ बोंडे, पप्पू चौधरी ,नितीन पाटील ,बबलू महाजन, प्रशांत नारखेडे ,पवन सराफ यांच्यासह तरुण दुर्गा उत्सव मित्र मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content