कोरपावली येथे मुस्लीम बांधवांनी केली शिवजयंती साजरी

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली या गावात पटेल, मुस्लीम शिवभक्तांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.

यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या उपसरपंच हमिदाबी पटेल यांचे चिरंजिव आणि पटेल मुस्लीम समाजातील तरुण सामाजिक कार्यकर्ते मुक्तार पटेल यांनी रायगडावर मुस्लीम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी भव्य अशी मस्जिद बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राजे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करून मानाचा मुजरा करत अभिवादन केले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पिरण पटेल, ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, अनस पटेल आदी उपस्थित होते.

Protected Content