यावल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयांमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावल येथील संपर्क कार्यालयात सर्व मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहीत जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करत जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, यावल तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष गौरव कोळी, मनसेचे पदाधिकारी, मनसेचे अजय तायडे, कुणाला बारी, राहुल पाटील , भुरा बोरोले, गजमल भिल, गोलु चौधरी उपस्थिती होती.

Protected Content