अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकावर संशय

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भालशिव येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फसू लावून पळून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील भालशिव येथे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तिचे पालक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २४ जून रोजी रात्री ८.३० वाजता कुटुंबिय जेवण करून घरात झोपले होते. २५ जून रोजी पहाटे ५ वाजता मुलीच्या आईला जाग आली असता मुलगी घरात दिसून आली नाही. त्यांनी मुलाचा सर्वत्र शोध घेतला असता त्यांची मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर मुलीच्या आईने सोमवारी २७ जून रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी सागर सुपडू सपकाळे रा. पिंप्री ता. यावल यांच्या विरोधात तक्रार दिली असून यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या‍ फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर सुपडू सपकाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.

Protected Content