शिस्त आणि संयामातूनच देशाचे नेतृत्व घडते – जिल्हाधिकारी राऊत

जळगाव प्रतिनिधी । २६जानेवारी २०२१ रोजी दिल्ली येथे राजपत येथे होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिटची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत (टी.वाय. बी. कॉम.) ही ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून यशस्वी जबाबदारी पार पडली. या वर्षी एन.सी.सी. महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र सैनिकांची निवड करण्यात आली होती. अमरावती एन.सी.सी. ग्रुपआणि १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन मधून समृद्धी एकमेव छात्र सैनिकाची निवड झाली होती. 

तिच्या या गौरव कार्याचा सत्कार करण्यासाठी के.सी.ई. संस्थेच्या मूळजी जेठा महाविद्यालातील जुना कॉन्फरन्स हॉल येथे १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी, कर्नल प्रविण धिमन, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस.एन. भारंबे यांच्या उपस्थित पार पडला.

कर्नल प्रविण धिमन यांनी या वेळी आपल्या भाषणात म्हणाले की, एन.सी. सी. राष्ट्राच्या जडण घडणीत एक महत्वाचा घटक आहे. समाजाला आदर्शवत तसेच चारित्र्यवान संपन्न बनविण्यात छात्र सैनिकांचा मोठा वाटा आहे. स्पर्धेच्या युगात या छात्र सैनिकांना विवेक बुद्धेने निर्णय घेण्यासाठी एन.सी. सी. योग्य प्रशिक्षण खूप असते. या साठी त्यानी मूळजी जेठा महाविदयालय प्रशासन आणि एन.सी.सी. अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले.  जिल्हाधिकारी राऊत म्हणाले: भारताला शिस्त प्रियसमाजाची आजच्या घडीला आवश्यकता असून एन.सी.सी. मधील शिस्त आणि संयमाचे यात मोठे योगदान आहे. समृद्धी संत यांचे यश जळगाव वासिंयाना प्रेरणा देणारे आहे. या बाबत त्यानी भावी आयुष्यासाठी छात्र सैनिकांना शुभेच्छा दिल्यात. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मुंढे म्हणाले, की, ते स्वतः एन.सी.सी. छात्र सैनिक होते. योग्यवेळी  योग्य मार्गदर्नाशानामुळे  युवक घडतो असे श्री मुंढे यांचे मत होते..

अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले, की, समृद्धीच्या यशात प्रशिक्षक आणि शिक्षक यांचे मोलाचे योगदान असते.  तसेच अनेक विद्यार्थिनींना केवळ आई –वडिलांनी सहयोग न केल्यामुळे यशापर्यंत पोहचता येत नाही. या साठी सजग पालकांचा अशा यशात मोलाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले.१८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन यांच्या वतीने तसेच महाविद्यालयाच्या वतीने छात्र सैनिक समृद्धी संत हिचा औपचारिक सत्कार स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पदेऊन करण्यात आला. तसेच ब्राम्हण सभा, युवा शक्ती यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला. या वेळी माजी एन.सी.सी. अधिकारी आणि कलाशाखेचे प्रमुख लेफ्ट.डॉ. बी.एन. केसुर, सुभेदार मेजर कोमल सिंग, समाजातील मान्यवर, समृद्धीचे पालक, छात्र सैनिक उपस्थित होते. या कार्याक्रमाचे नियोजन आणि सूत्र संचालन एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे यांनी केले.

 

Protected Content