‘नूतन मराठा’ मनमानी ; आरोपी फरार , नोकऱ्या धोक्यात

 

जळगाव : प्रतिनिधी । मनमानीपणे खोट्या हजेरीपत्रकांवर सह्या करून फक्त पगार घेणाऱ्या नूतन मराठा महाविद्यालयातील आरोपी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचे सांगितले जात असतानाच हे आरोपी फरार झाल्याने सर्वांचे लक्ष आता पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे .

 

१९ जुलै रोजी  नूतन मराठा महाविद्यालयात ७ लोकं चार वर्षापासून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा देत असल्याचे खोटे हजेरीपत्रकावर एकाच दिवशी सह्या करताना रंगेहात संस्थेचे प्रभारी अध्यक्ष ॲड. विजय भास्करराव पाटील यांनी पकडले होते. पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तपास करून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

 

भारतीय दंड संहिता अधिनियम :१८६० प्रमाणे १२०-B,४६५,४६७,४६८,४२०,३४ या कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे   गुन्हयामध्ये गंभीर व महत्त्वपूर्ण कलमांचा समावेश करण्यात आला  यामुळे आरोपींच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. अद्याप कोणत्याच आरोपींनी जामीन घेतलेला नाही. काही आरोपींनी रजा  टाकली असून ते  फरार आहेत.

 

अण्णा पाटील गट आरोपींना अटक करण्यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे. ॲड. पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली असल्याचे कळते.

 

गुन्ह्यांमध्ये ०४ पर्मनंट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्राचार्य डॉ. एल.  पी . देशमुख, उपप्राचार्य ए.  बी . वाघ, शिवराज मानके – पाटील, पी.  ए . पाटील यांचा समावेश आहे. आरोपींना अटक झाल्यास व २४ तासापेक्षा जास्त वेळ त्यांना कारागृहात राहावे लागल्यास त्यांच्या नोकरीचे भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित.

 

आरोपी जरी नॉटरिचेबल असले तरी पोलिस त्यांचा शोध घेत आहे. काही आरोपीच्या घरी पोलिसांनी जाऊन चौकशी देखील केली परंतु ते आढळून आलेले नाहीत.

 

Protected Content