शिवसेनेचे ईबा पटेल यांनी एनआरसी विरोधात राजदंड पळवला ; महासभा तहकूब (व्हीडीओ)

b46cf7c8 1aac 4236 b82c 973d0d65124c

जळगाव (प्रतिनिधी) नागरिकत्व कायद्या (एनआरसी) विरोधात शिवसेनेचे नगरसेवक ईबा पटेल यांनी राजदंड पळविल्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर महासभा १५ मिनिटासाठी तहकूब करण्यात आली आहे. तर पटेल यांच्यासह एमआयएमचे रियाज अली यांना देखील आजच्या सभेपुरता निलंबित करण्यात आले आहे.

 

 

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी महापालिकेची महासभा होती. सभा सुरु झाल्यानंतर ‘नागरिकत्व कायदा (एनआरसी) आणि सीएए विरोधात आज शिवसेनेचे नगरसेवक ईबा पटेल हे प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी थेट राजदंड पळविला. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी पटेल यांना अपात्र करत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही म्हणत एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर नगरसेवक कैलास सोनवणे हे सभागृहात बोलले. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत आजची महासभा १५ मिनिटासाठी तहकूब करण्यात आली होती. तर पटेल यांच्यासह एमआयएमचे रियाज अली यांना देखील आजच्या सभेपुरता निलंबित करण्यात आले आहे.

 

 

Protected Content