Home Cities जळगाव जिल्हयांतील उद्योजकांसाठी ७ मार्च रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

जिल्हयांतील उद्योजकांसाठी ७ मार्च रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

( Image Credit Source : Twitter )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील उद्योजकांसाठी व उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीला चालना देण्यासाठी हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळ, जळगांव येथे गुरुवार ७  मार्च रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. या परिषेदला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे मार्गदर्शन करणार आहेत.

गुंतवणूक परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्र असलेल्या कृषीआधारित उद्योगांमध्ये तसेच इतर उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या उद्योगांना गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी एक खिडकी योजना प्रस्तावित असुन सेवा, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक प्रकल्प आदी पायाभूत सुविधा देण्याबाबत तसेच गुंतवणुकदारांना उद्योगांसाठी लागणार विविध परवाने, अनुदान आदी अनुषंगिक बाबी उद्योगास प्राधान्याने दिल्या जाणार आहेत. या परिषेदेत औद्योगिक संघटना, उद्योजक, औद्योगिक समुह, सनदी लेखापाल, उद्योग व्यवसायाशी संबंधीत शासकीय विभाग यांनी परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी केले आहे.


Protected Content

Play sound