मला तिकिट द्यायला फडकेंचे वडील वरून आले होते का ? : खडसेंचा पलटवार

मुक्ताईनगर muktainagar प्रतिनिधी । ”डॉ.फडके म्हणतात की नाथाभाऊंना ब्राह्मणांनी तिकीट दिले. पण फडकेंच्या वडिलांचा मृत्यू १९८४मध्ये झाला. मला विधानसभेचे तिकीट १९९० मध्ये तिकीट मिळाले. मग मला तिकीट देण्यासाठी त्यांचे वडील वरून आले होते का ?” असा प्रश्‍न विचारत एकनाथराव खडसे यांनी डॉ. राजेंद्र फडके यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके (dr. rajendra phadke ) यांनी अलीकडे माजी मंत्री एकनाथराव खडसे (eknath khadse ) यांच्यावर जोरदार टीका चालवली आहे. यातच बोदवड येथील कार्यक्रमात बोलतांना त्यांनी एका ब्राह्मणाने उदारभाव दाखविल्यानेच खडसेंना तिकिट मिळाले होते याची आठवण करून दिली होती. यात फडकेंचा रोख हा त्यांचे वडील दिवंगत डॉ. अशोक फडके यांच्याकडे होता. यालाच एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर दिले.

१२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) हे राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यानिमित्त मुक्ताईनगरात येत आहेत. या दौर्‍याच्या नियोजनासाठी शनिवारी मुक्ताईनगरात राष्ट्रवादीची बैठक झाली. याप्रसंगी एकनाथराव खडसे म्हणाले की, ”डॉ.फडके म्हणतात की नाथाभाऊंना ब्राह्मणांनी तिकीट दिले. पण फडकेंच्या वडिलांचा मृत्यू १९८४ मध्ये झाला. मला विधानसभेचे तिकीट १९९०मध्ये तिकीट मिळाले. मग मला तिकीट देण्यासाठी त्यांचे वडील वरून आले होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, आपण निवडणुकीवेळी असतो तर डॉ.फडके व कांडेलकरांना एकही ग्रामपंचायत मिळाली नसती. आता देखील फडकेंचे गाव असणार्‍या वढोद्यात राष्ट्रवादीचा सरपंच होणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर जे स्वत: नेते म्हणून वावरतात, त्यांना आपले गावदेखील सांभाळता येत नसल्याचा टोला देखील खडसे यांनी याप्रसंगी मारला.

याप्रसंगी खडसे यांनी वीज बिलांवरून भाजपच्या दुटप्पीपणावर जोरदार टीकास्त्र सोडले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे (ncp) जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महिलाध्यक्षा कल्पना पाटील, युवक अध्यक्षा कल्पिता पाटील,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, विनोद तराळ, तालुकाध्यक्ष यू.डी. पाटील, पं.स. सभापती प्रल्हाद जंगले,सुलभा पाटील, ईश्‍वर रहाणे, किशोर चौधरी, राजू माळी, रामभाऊ पाटील, विलास धायडे,पांडुरंग नाफडे यांची उपस्थिती होती.

Protected Content