धरणगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : भाजपची मागणी

धरणगाव । अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

भाजपतर्फे आज तहसीलदारांना निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १५ ते २० दिवसांपासून तालुक्यात अवकाळी अतिवृष्टिमुळे शेतकर्‍यांचे ज्वारी,मका,कापुस,सोयाबीन, मुंग व उडीद,इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकरी बंधु फार मोठ्या संकटात सापडला आहे.सर्व पिके कवडीमोल झालेले आहेत तरी शासनाने त्वरीत पंचनाम्याचे आदेश देऊन धरणगाव तालुका ओला दुष्काळी जाहिर करावा शासनाने संकटात सापडलेला शेतकर्‍याला त्वरीत आर्थिक मदत करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

हे निवेदन निवेदन तहसीलदार नितीन देवरे यांना देण्यात आले. त्या प्रसंगी भाजपचे नेते शिरीष बयस, अ‍ॅड. संजय महाजन, पुनिलाल महाजन, शेखर पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अ‍ॅड. वसंतराव भोलाणे, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी ,मधुकर रोकड़े,जेष्ठ नगरसेवक शरद धनगर,ललित येवले,सुनिल चौधरी,राजू महाजन,कन्हैया रायपुरकर,टोनी महाजन ,शरद भोई,सचिन पाटील,शुभम चौधरी,विक्की महाजन,समाधान पाटील,विकास चव्हाण,प्रदिप महाजन आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content