जॉन्सन ॲण्ड जॉन्सन’ कोरोना लस ; तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

नवी दिल्ली  वृत्तसंस्था । प्रसिद्ध ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ कंपनीकडून कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी तयार केल्या जात असलेल्या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता या लशीनं तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात केल्याचं जाहीर करण्यात आलंय. कंपनी ‘नॉट फॉर प्रॉफीट’ तत्वावर ही लस तयार करत आहे

सुरुवातीच्या स्टेजमध्ये या लशीचे सकारात्मक निकाल हाती लागलेले आहेत. ‘फेज ३ ट्रायल’मध्ये लशीचा ६० हजार लोकांवर प्रयोग करण्यात आला. यासाठी अमेरिकेसहीत जगातील २०० जागांची निवड करण्यात आली. ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ची लस प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहचणारी जगातील दहावी लस ठरलीय. तिसऱ्या टप्प्यात पोहचणारी ही अमेरिकेची चौथी लस ठरलीय. . चाचणीचे पुढचे टप्पेही यशस्वीपणे पार पडले तर २०२१ पर्यंत या लशीला परवानगी मिळू शकेल.

येत्या डिसेंबरपर्यंत ही लस कोरोना रोखण्यात प्रभावी ठरते की नाही हे स्पष्ट होईल, ‘मॉडर्ना’ आणि ‘अस्त्राजेनेका’ यांनाही जवळपास या वेळेपर्यंत लशींच्या प्रभावाचे निकाल मिळू शकतील.

अमेरिकेकडून ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ला ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ अंतर्गत १.४५ बिलियन डॉलरचं फंडिंगही देण्यात आलंय. जॉन्सन अॅन्ड जॉन्सनसची लस सर्दी – खोकल्यावर आधारीत एडेनोवायरलच्या सिंगल डोसवर आधारीत आहे. यामध्ये नव्या कोरोना व्हायरसच्या ‘स्पाईक प्रोटीन’चाही समावेश करण्यात आलाय. कंपनीनं हीच पद्धत इबोला लस तयार करण्यासाठीही वापरली होती.

Protected Content