सुशांतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत

मुंबई वृत्तसंस्था । सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबमधील (सीएफएसएल) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. सीएफएसएलने आपला हा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी तीन महिन्यांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तपासाचा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. सीएफएसएलने सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील राहत्या घरी क्राइम सीनचे रिक्रिएशन केले होते. त्यामध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे समोर आले. दरम्यान सीएफएसएलने हा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे. या अहवालाला अधिकृत दुजोरा सीबीआयकडून लवकरच देण्यात येण्याची शक्यता आहे.

सीएफएसएलच्या अहवालामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे कारण पार्शियल हँगिंग असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पाय फाशीच्या दरम्यान पूर्णपणे हवेत नव्हते. तर त्याचा पाय जमिनीला लागत होता किंवा बेड किंवा स्टूलसारख्या कुठल्याही वस्तूला लागलेले होता. क्राइम सीनचे रिक्रिएशन आणि पंख्याला लटकलेल्या कपड्याच्या क्षमतेची चाचणी केल्यानंतर सीएफएसएलने हा अहवाल तयार केला आहे.

रिपोर्टनुसार सुशांतने आपल्या उजव्या हाताचा वापर स्वत:ला लटकवून घेण्यासाठी केला असावा. त्याच्या गळ्यावर पडलेल्या लिगेचर मार्कच्या गाठीच्या स्थितीचाही अ‍ॅनॅलिसिस रिपोर्टमध्ये उल्लेख आहे.

Protected Content